Aarti Badade
लसूणमध्ये अॅलिसिन नावाचे संयुग असते, जे विषाणू, बॅक्टेरिया आणि फंगल संसर्गांपासून संरक्षण करते.
लसूण नाक, घसा आणि छातीत रक्तसंचय कमी करून सहज श्वास घेण्यास मदत करते.
लसूण नैसर्गिक रक्त पातळ करणारे आहे. त्यामुळे शरीरात उब टिकते आणि थंडीचा त्रास कमी होतो.
लसूण वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करून चांगला कोलेस्ट्रॉल (HDL) वाढवतो, ज्यामुळे हृदय निरोगी राहते.
लसूणमधील घटक पचन सुधारतात, जळजळ आणि गॅस यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
लसूण खाल्ल्याने त्वचा चमकदार होते आणि केस गळती कमी होते. अँटीऑक्सिडंट्स त्वचा निरोगी ठेवतात.
दररोज सकाळी रिकाम्या पोटी २-५ पाकळ्या खाल्ल्यास संपूर्ण आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.