सकाळ डिजिटल टीम
हिवाळ्यात हृदयाचे आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी अनेक पोषकतत्त्वांची गरज असते. त्यामुळे पुढील पदार्थांचे सेवन करणे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
पालाभाजेयांमध्ये व्हिटॅमिन ए,सी, के, अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर यांसारखे पोषकतत्त्वे असतात जे रक्तदाब कमी कारण्यात आणि धमन्यांचे कार्य सुरळीत ठेवण्यात मदत करतात.
संत्री व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि फायबरने युक्त असतात. व्हिटॅमिन सी हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते तर फायबर कोलेस्टेरॉल शोषण कमी करण्यास मदत करते.
सुका मेवा ओमेगा-३ फॅटी ऍसिडस्, फायबर आणि मॅग्नेशिअमचे एक उत्तम स्रोत आहे. ओमेगा-३ फॅटी ऍसिडस् जळजळ कमी करते आणि कोलेस्टेरॉल पातळी सुधारते. तर मॅग्नेशिअम रक्तदाब संतुलित ठेवते.
डाळिंबात पॉलीफेनॉल नावाचे अँटिऑक्सिडेंट असतात, जे धमन्यांमध्ये प्लेक जमा होणे कमी करतात. तसेच डाळिंबाचा रस प्यायल्याने किंवा बिया खाल्ल्याने रक्ताभिसरण सुधारते व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा धोका कमी होण्यास मदत होते.
यामध्ये असणाऱ्या सक्रिय कंपाऊंड, ऍलिसिनमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आहेत जे रक्तवाहिन्यांचे संरक्षण करतात.
गाजर बीटा-कॅरोटीन, फायबर आणि पोटॅशियममध्ये समृद्ध असतात. हे कोलेस्टेरॉल कमी करून आणि रक्तदाब कमी करून हृदयाचे आरोग्य संतुलित ठेवतात. गाजरामधील अँटिऑक्सिडंट्समुळे शरीरातील जळजळ कमी होते व हृदय विकारांचा धोका टाळतो.
बीटमध्ये नायट्रेट्सचे प्रमाण जास्त असते, ज्याचे शरीर नायट्रिक ऑक्साईडमध्ये रूपांतरित करते, हे रक्तवाहिन्या शिथिल करण्यास आणि रक्तदाब कमी करण्यास मदत करते.