मऊ थंड असणारे 'हे' सुपरफूड नक्की खा, शरीर होईल ताजेतवाने!

Monika Shinde

ताडगोळे

उन्हाळ्यात तापमान चांगलं वाढतंय आणि हवेचं वातावरणही चांगलं गरम होतंय. अशावेळी रोज कलिंगड, टरबूज खाऊन कंटाळा आला असेल, तर थंड, मऊ, चवीला मस्त असणारं ताडगोळे खायला चालू करा.

चविस्ट सुपरफूड

'हे' चविस्ट सुपरफूड असून त्यासोबतच त्याचे अनेक आरोग्यादायी फायदे आहेत. चला, मग कोणते फायदे आहेत जाणून घेऊया.

थंडपणा

ताडगोळे तुम्हाला शीतलता आणि ताजेपण देतात. उन्हाळ्यात शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी ते उत्तम आहेत.

पचनासाठी फायदेशीर

ताडगोळे पचनासाठी चांगले आहेत. त्यामध्ये नैसर्गिक फायबर्स असतात. ज्यामुळे तुमचे पचनक्रिया सुधारते.

स्वादिष्ट आणि हलके

त्याचा गोडसर चव तुमच्या जिभेवर नवा अनुभव देतो. हलके आणि मऊ असल्यामुळे, ते सहज पचवता येतात.

आवश्यक पोषण

ताडगोळ्यांमध्ये विविध पोषणतत्त्वे असतात, ज्यामुळे तुमच्या शरीराला लागणारे फायबर्स, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मिळतात.

ताडगोळे कसे खावे

ताजे ताडगोळे फ्रिजमध्ये ठेवून थंड करून खा. तुम्ही ताडगोळे गोडसर चवीसाठी साखरेसोबत खाऊ शकता.

शरीरातील उष्णता वाढण्याचे 5 प्रमुख करणे

येथे क्लिक करा...