Aarti Badade
गाजर, रताळे आणि बीट ही कंदमुळे पोषक घटकांनी परिपूर्ण असतात. यामध्ये व्हिटॅमिन A, C आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे डोळ्यांची दृष्टी टिकवून ठेवण्यास मदत करतात.
गाजरात बीटा-कॅरोटीन असते, जे शरीरात व्हिटॅमिन A मध्ये रूपांतरित होते. हे व्हिटॅमिन डोळ्यांच्या पडद्याचे (retina) संरक्षण करते व रात्री स्पष्ट पाहण्यात मदत करते.
रताळ्यामध्ये व्हिटॅमिन A, C आणि E भरपूर प्रमाणात असतात. हे डोळ्यांचे संरक्षण करून त्यांना निरोगी ठेवण्यास महत्त्वाची भूमिका बजावतात.
बीटमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि नायट्रेट्स असतात, जे डोळ्यांमधील रक्तप्रवाह वाढवतात आणि मोतीबिंदू व मॅक्युलर डिजेनेरेशन यांसारख्या आजारांचा धोका कमी करतात.
गाजर, बीट आणि रताळे तुम्ही सूप, पराठे, कोशिंबीर किंवा रसाच्या स्वरूपात नियमित आहारात घेऊ शकता. त्यात थोडंसं मध घालून प्यायल्यास अधिक लाभ मिळतो.
पालक, मेथी यांसारख्या पालेभाज्यांमध्ये आणि बदाम, अक्रोड, बिया यामध्ये डोळ्यांसाठी उपयुक्त व्हिटॅमिन A, E आणि ओमेगा-3 भरपूर असतात.
नियमित डोळ्यांची तपासणी करा, स्क्रीन टाईम कमी ठेवा, पुरेशी झोप घ्या, धूम्रपान व मद्यपान टाळा, आणि डोळ्यांसाठी व्यायाम करा.