Aarti Badade
गाजर खाणे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असते, कारण त्यात आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात.
अर्धा कप गाजरात फक्त २५ कॅलरीज असून त्यात फायबर, व्हिटॅमिन A, K, C, लोह आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते.
बहुतेक लोक गाजर सोलून खातात, पण त्यामुळे गाजरातील मौल्यवान अँटीऑक्सिडंट्स आपण गमावतो.
गाजराच्या सालीमध्ये बीटा-कॅरोटीन भरपूर असते, जे गाजराचे मुख्य औषधी घटक मानले जातात.
बीटा-कॅरोटीन यकृतात जाऊन व्हिटॅमिन A मध्ये रूपांतरित होते, जे डोळ्यांचे आरोग्य आणि त्वचेकरिता फायदेशीर ठरते.
सालासकट कच्चं गाजर खाल्ल्याने बद्धकोष्ठता दूर होते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते.
गाजर दररोज खाल्ल्याने शरीरातील लोहाचे प्रमाण वाढते आणि रक्तनिर्मितीस चालना मिळते, त्यामुळे अशक्तपणा कमी होतो.
गाजराचा रस आवळा, पुदिना आणि तुळशीसह घेतल्यास लैंगिक कमजोरी, पांढऱ्या स्त्रावासारख्या समस्या आणि एकूण ताकद वाढते.