Aarti Badade
कृत्रिम स्वीटनर साखरेसारखे गोड असले तरी ते शरीरासाठी अपायकारक असतात.त्यांचा नियमित वापर आतड्यांच्या नैसर्गिक कार्यावर वाईट परिणाम करतो.पचनसंस्था बिघडते, आणि सूज व गॅससारख्या समस्या निर्माण होतात.
बेकन, सॉसेज यासारख्या मांसाचे अधिक सेवन डिमेंशियाचा धोका वाढवते.स्मरणशक्ती कमी होणे, मानसिक थकवा आणि संज्ञानात्मक क्षमता घटते.नियमित सेवन मानसिक आरोग्यावर नकारात्मक प्रभाव टाकते.
मद्यपानामुळे यकृतावर अतिरिक्त भार येतो आणि हानी होते.उच्च रक्तदाब, हृदयविकार व स्ट्रोकचा धोका वाढतो.दीर्घकाळ सेवन शरीरात गंभीर समस्या निर्माण करू शकते.
साखरेमुळे लठ्ठपणा आणि मधुमेह वाढतो, जे किडनीसाठी घातक आहे.ही साखर थेट किडनी बिघडवत नाही, पण किडनी विकारांची शक्यता वाढवते.नियमित साखर खाणे टाळा किंवा नैसर्गिक पर्याय निवडा.
हाय-प्रोसेस्ड तेलांमध्ये ट्रान्स फॅट्स असतात जे धमन्यांवर परिणाम करतात.कोलेस्ट्रॉल वाढतो, रक्तवाहिन्या अरुंद होतात आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. मध्यम प्रमाणात आणि संतुलित तेल वापरणेच सुरक्षित.
रात्री उशिरा जड अन्न खाणे, सतत जंक फूड खाणे आरोग्यास हानीकारक असते.पचन बिघडते, झोपेवर परिणाम होतो, आणि वजन वाढते.योग्य वेळेवर, योग्य प्रमाणात अन्न सेवन करणे गरजेचे आहे.
वरील अन्नपदार्थ तात्काळ अपाय करत नाहीत, पण सातत्याने घेतल्यास आजार निर्माण होतो.वैयक्तिक प्रकृतीनुसार काही पदार्थ अजूनही घातक ठरू शकतात.कोणतीही बदल करण्यापूर्वी आहारतज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.