Anushka Tapshalkar
मका हा नेहमीच भारतीय अन्नाचा एक भाग राहिला आहे. आजही मक्याचा आपल्या आहारात समावेश आहे. मग ते पॉप कॉर्न, कॉर्न फ्लेक्स किंवा भाजलेले कणिस असो, लोक मका मोठ्या उत्साहाने खातात.
मक्यामध्ये फायबरसह विविध जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. त्यामध्ये मँगनीज, फॉस्फरस, मॅग्नेशियम, जस्त आणि तांबे यांसारखी पोषकद्रव्येही असतात, जी आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहेत.
मका हा फायबरचा उत्तम स्रोत आहे, जो आहारात समाविष्ट केल्याने रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही व ब्लड शुगर नियंत्रित राहते.
मका खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते, ज्यामुळे अतिरिक्त कॅलरीज टाळता येतात. नियमित मका सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
मकामध्ये व्हिटॅमिन सी असते, जे प्रतिकारशक्ती बळकट करण्यात मदत करते. त्यामुळे हिवाळ्यात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मक्याचे सेवन करावे.
मक्यातील फायबर आणि फायटोन्यूट्रिएंट्स खराब कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयाच्या आरोग्यास मदत करतात. याच्या सेवनाने रक्तातील लिपिड प्रोफाइल सुधारते.
मक्यामध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन हे दोन अँटिऑक्सिडंट्स असतात, जे डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यात मदत करतात. हे वयामुळे होणाऱ्या डोळ्यांच्या समस्यांना टाळतात आणि मोतीबिंदू होण्याचा धोका कमी करतात.
ग्लूटेन-संवेदनशील असलेल्या किंवा ग्लूटेन-मुक्त आहाराचा अवलंब करणाऱ्यांसाठी मका हा एक उत्कृष्ट पर्याय आहे, कारण मका पूर्णतः ग्लूटेन-मुक्त आहे.