Sandeep Shirguppe
बाजरीची भाकरी खाण्याचे अनेक फायदे असल्याने आरोग्यासाठी उपयुक्त ठरते.
बाजरीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता टाळता येते.
बाजरीचा ग्लायसेमिक इंडेक्स (Glycemic Index) कमी असल्याने शुगर नियंत्रित राहण्यास मदत होते.
लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरससारखे पोषक घटक मिळवण्यासाठी बाजरीची भाकरी खावी.
बाजरीमध्ये असलेले मॅग्नेशियम आणि पोटॅशियम हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात.
हाडे मजबूत होण्यासाठी बाजरीच्या भाकरीचे रोज सेवन करायला हवं.
पावसाळ्यात ताजेतवाने रहायचं असेल तर बाजरीची भाकरी खाल्ल्यास शरीराला ऊर्जा मिळते.
बाजरी ग्लूटेन फ्री असल्याने गव्हाची ऍलर्जी आहे, त्यांच्यासाठी बाजरीची भाकरी एक चांगला पर्याय आहे.