पलंगावर बसून जेवण केल्यास काय होऊ शकते?

Aarti Badade

सोयीचे की नुकसानदायक?

आजकाल लॅपटॉप किंवा मोबाईल पाहत पलंगावर बसून जेवणे ही अनेकांची फॅशन झाली आहे. पण ही आरामदायी वाटणारी सवय तुमच्या शरीराला हळूहळू पोखरत आहे.

Side effects of eating in bed

|

Sakal

पचनसंस्थेवर होतो गंभीर परिणाम

जेवताना ताठ बसणे आवश्यक असते. पलंगावर आपण वाकून बसतो, ज्यामुळे पोटावर दाब येतो आणि पचनक्रिया मंदावते. यामुळे गॅस आणि अपचनाचा त्रास होतो.

Side effects of eating in bed

|

Sakal

ॲसिडिटी आणि छातीत जळजळ

आडवे होऊन किंवा पलंगावर लोळून खाल्ल्यास अन्न अन्ननलिकेत अडकण्याची शक्यता असते. यामुळे ॲसिड रिफ्लक्स, छातीत जळजळ आणि आंबट ढेकर येण्याचे प्रमाण वाढते.

Side effects of eating in bed

|

Sakal

लठ्ठपणा आणि 'ओव्हरईटिंग'

स्क्रीनकडे पाहत जेवल्यामुळे आपण किती खातोय याकडे लक्ष राहत नाही. यामुळे 'माईंडफुल इटिंग' होत नाही आणि गरजेपेक्षा जास्त खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो.

Side effects of eating in bed

|

Sakal

स्वच्छतेचा प्रश्न आणि बॅक्टेरिया

पलंगावर पडलेले अन्नाचे सूक्ष्म कण चादरी आणि गादीमध्ये अडकतात. यामुळे बुरशी, मुंग्या आणि जंतू वाढतात, ज्यामुळे त्वचेची ॲलर्जी किंवा इन्फेक्शन होऊ शकते.

Side effects of eating in bed

|

Sakal

झोपेच्या गुणवत्तेत अडथळा

बेड ही विश्रांतीची जागा आहे. तिथेच जेवण आणि काम केल्यामुळे मेंदू गोंधळतो, परिणामी झोपेचे चक्र विस्कळीत होते आणि शांत झोप लागत नाही.

Side effects of eating in bed

|

Sakal

आळशी जीवनशैलीचा धोका

पलंगावर बसून खाण्यामुळे शारीरिक हालचाल कमी होते. दीर्घकाळ ही सवय राहिल्यास मधुमेह (Diabetes) आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो.

Side effects of eating in bed

|

Sakal

योग्य पद्धत कोणती?

आरोग्य जपण्यासाठी नेहमी जमिनीवर किंवा डायनिंग टेबलवर ताठ बसून जेवा. जेवणानंतर लगेच झोपू नका, किमान १०-१५ मिनिटे शतपावली करा.

Side effects of eating in bed

|

sakal

किडनी डिटॉक्सचा सुपर फॉर्म्युला! ‘हे’ 8 पदार्थ अवघ्या 1 तासात करतील स्वच्छ

Kidney Detox Foods

|

Sakal

येथे क्लिक करा