Payal Naik
मासिक पाळीबद्दल अनेक समज गैरसमज आहेत. स्त्रियांना मासिक पाळीदरम्यान आजही अनेक नियम पाळावे लागतात.
EATING PICKLE DURING MENSTRUATION
ESAKAL
त्यात मासिक पाळीच्या दिवसात लोणच्याच्या बरणीला हात लावू नये किंवा लोणचं खाऊ नये असे अनेक समज आहेत.
EATING PICKLE DURING MENSTRUATION
ESAKAL
मात्र यात कितपत तथ्य आहे? या गोष्टीचा आणि मासिक पाळीचा थेट काहीही संबंध नाही. यामागचं वैज्ञानिक सत्य वेगळं आहे.
EATING PICKLE DURING MENSTRUATION
ESAKAL
तुम्ही मासिक पाळीत लोणचं खाऊ शकता. पण ते जास्त प्रमाणात खाणं टाळावं असं डॉक्टर सांगतात. त्यामागे कारण आहे.
EATING PICKLE DURING MENSTRUATION
ESAKAL
लोणचं खाल्ल्याने पाळीचा रक्तस्राव थांबतो किंवा लोणच्याच्या बरणीतलं लोणचं खराब होतं यात तथ्य नाही.
EATING PICKLE DURING MENSTRUATION
ESAKAL
डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार, लोणचं टाळण्यामागचं मुख्य कारण आहे जास्तीचं मीठ.
EATING PICKLE DURING MENSTRUATION
ESAKAL
लोणच्यात मिठाचं प्रमाण खूप जास्त असतं. मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना शरीरात पाणी साचून राहणे आणि पोट फुगणे यासारखे त्रास होतात.
EATING PICKLE DURING MENSTRUATION
ESAKAL
जास्त मीठ खाल्ल्यास ही समस्या आणखी वाढू शकते आणि क्रॅम्प्स देखील वाढू शकतात.
EATING PICKLE DURING MENSTRUATION
ESAKAL
यासोबतच मसालेदारपणा हे देखील लोणचं न खाण्याचं एक कारण आहे.
EATING PICKLE DURING MENSTRUATION
ESAKAL
लोणच्यामध्ये तिखट आणि गरम मसाले जास्त असतात. यामुळे काही महिलांना पचनाचे त्रास किंवा ऍसिडिटी होण्याची शक्यता असते, ज्यामुळे पोटदुखी वाढू शकते.
EATING PICKLE DURING MENSTRUATION
ESAKAL
जर तुम्हाला लोणचं खाण्याची तीव्र इच्छा होत असेल तर तुम्ही अतिशय कमी प्रमाणात लोणचं खाऊ शकता
EATING PICKLE DURING MENSTRUATION
ESAKAL
पण जर तुम्हाला पाळीदरम्यान सूज किंवा पोटदुखीचा त्रास जास्त होत असेल, तर लोणचं आणि इतर खारट व मसालेदार पदार्थ टाळावेत.
EATING PICKLE DURING MENSTRUATION
ESAKAL
थोडक्यात सांगायचं तर, लोणचं खाल्लं म्हणून 'पाळी थांबत नाही', पण 'पोट दुखू शकतं' हे मुख्य कारण आहे.
EATING PICKLE DURING MENSTRUATION
ESAKAL
तेजश्री प्रधानला पहिल्यांदा प्रपोज कुणी केलेला माहितीये? स्वतः केलेला खुलासा
tejuTEJASHREE PRADHAN
esakal