रात्री भात खाणे योग्य की अयोग्य? आयुर्वेद काय सांगतं?

संतोष कानडे

आयुर्वेद

आयुर्वेदानुसार रात्रीचे जेवण हलके, ताजे आणि सहज पचणारे असावे.

भात

भात हा पचायला तुलनेने हलका मानला जातो, मात्र त्याचा परिणाम व्यक्तीच्या प्रकृती आणि प्रमाणावर अवलंबून असतो.

गरम आणि ताजा

रात्री कमी प्रमाणात गरम आणि ताजा भात खाल्ल्यास अनेकांना तो सहज पचू शकतो.

फ्रीज

थंड, शिळा किंवा फ्रीजमध्ये ठेवलेला भात रात्री खाणे आयुर्वेदानुसार टाळावे.

मूगडाळ

भातासोबत मूगडाळ, तूप आणि पचायला हलक्या भाज्या घेतल्यास पचनास मदत होऊ शकते.

अपचन

अतिप्रमाणात भात खाल्ल्यास जडपणा आणि अपचनाचा त्रास जाणवू शकतो.

झोपणे टाळावे

रात्री जेवण करून लगेच झोपणे टाळावे आणि थोडे चालावे.

पचनशक्ती

ज्यांची पचनशक्ती कमी आहे किंवा कफ प्रकृती आहे त्यांनी भाताचे प्रमाण मर्यादित ठेवावे.

थंड अन्न पुन्हा गरम करून खाण्याबद्दल आयुर्वेदात काय सांगितलंय?

<strong>येथे क्लिक करा</strong>