Anushka Tapshalkar
दिवसाची सुरुवात आरोग्यदायी पदार्थांनी करावी असा सल्ला नेहमीच दिला जातो आणि मूठभर भिजवलेल्या बदामाच्या पोषक तत्वांशी कशाचीच तुलना होणार नाही.
सकाळी बदाम खाल्ल्याने स्नायूंची तंदुरुस्ती आणि वाढ होण्यास मदत होते.
बदामातील मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्समुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते आणि खराब कोलेस्टेरॉल पातळी कमी करण्यात मदत होते.
व्हिटॅमिन ई मुळे त्वचेच्या पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते. हे वृद्धत्वाची चिन्हे कमी करून त्वचा हायड्रेट ठेवते, ज्यामुळे तरुण त्वचा मिळते.
फायबरयुक्त बदाम पचायला सोपे असतात. तसेच रक्तातील साखर प्रमाण नियंत्रित ठेवतात,आतड्याचे आरोग्य सुधारून बद्धकोष्ठतेचा धोका कमी करतात.
बदामामध्ये मुबलक प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात, प्रामुख्याने फ्लेव्होनॉइड्स, जे ऑक्सिडेटिव्ह तणावाचा सामना करण्यास आणि जळजळ कमी करण्यास मदत करतात.
मॅग्नेशियम स्नायूंना आराम देते आणि तणाव कमी करते. तसेच हाडांच्या आरोग्यास मदत करते आणि मायग्रेन व टाइप 2 मधुमेह सारख्या परिस्थितीस प्रतिबंध करते.
बदामातील कॅलरीज भूक कमी करून वजन व्यवस्थापनास मदत करतात.
दररोज बदामाचे सेवन केल्याने स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते आणि विशेषत: लहान मुलांच्या आणि वृद्धांच्या मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.