Aarti Badade
डार्क चॉकलेटमध्ये असणारे फ्लेव्होनॉइड्स रक्तदाब संतुलित ठेवण्यास मदत करतात आणि त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवून अनेक आजारांपासून संरक्षण करतात, विशेषतः कर्करोगासारख्या गंभीर व्याधींपासून.
डार्क चॉकलेट खाल्ल्यामुळे एंडोर्फिन व सेरोटोनिन सारखे 'हॅप्पी हार्मोन्स' तयार होतात, जे मूड चांगला ठेवतात आणि तणाव कमी करतात.
यातील फ्लेव्होनॉइड्स मेंदूमध्ये रक्तप्रवाह वाढवतात, ज्यामुळे लक्ष केंद्रित करण्याची क्षमता आणि स्मरणशक्ती सुधारते.
काही संशोधनांनुसार, डार्क चॉकलेट खाल्ल्याने पचनासंबंधित त्रास – विशेषतः अतिसार यावर आराम मिळतो.
डार्क चॉकलेट त्वचेला सूर्यप्रकाश व प्रदूषणापासून वाचवते आणि त्वचेला एक नैसर्गिक तेज प्रदान करते.
ही चॉकलेट भूक कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे वजन कमी करण्याच्या प्रयत्नांना हातभार लागतो.
डार्क चॉकलेटचे आरोग्यदायी फायदे मिळवण्यासाठी ते मर्यादित प्रमाणातच सेवन करणे गरजेचे आहे. अति सेवन केल्यास काही दुष्परिणाम जाणवू शकतात.