Anuradha Vipat
गेल्या आठवड्यात ईडीने अभिनेत्री गेहाना वशिष्ठ यांच्या घरावर धाड टाकली होती.
आता अभिनेत्री गहना वशिष्ठ हीची चौकशी करण्यात आली आहे.
आज सोमवारी गहना ईडी कार्यालयात आली होती.
तिथे गहनाची सुमारे सात तास चौकशी करण्यात आली.
गहनाला पुन्हा मंगळवारी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे
गहना हीचे नाव बऱ्याच काळापासून पॉर्नोग्राफी प्रकरणाशी जोडलेले गेले आहे.
गेल्या आठवड्यात तिच्या घरी छापे पडले होते. त्यात अनेक वस्तू जप्त करण्यात आल्या होत्या.