Pranali Kodre
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी अष्टपैलू आणि ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू कॅमेरॉन ग्रीन लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
ग्रीनने नुकतीच त्याची गर्लफ्रेंड एमिली रेडवूडसोबत साखरपूडा केला आहे.
ग्रीनने त्याच्या साखरपूड्याची बातमी इंस्टाग्रावर पोस्ट करत दिली आहे.
त्याची होणारी पत्नी एमिली ही आहारतज्ञ आणि पीएचडी विद्यार्थीनी आहे.
दरम्यान सध्या ग्रीन दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया संघातून बाहेर आहे. त्यामुळे तो आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीही खेळणार नाही.
ग्रीनने पाठीच्या दुखापतीमुळे आयपीएल २०२५ मधूनही माघार घेतली आहे. तो २०२४ मध्ये आरसीबी संघाचा भाग होता.
त्याला सप्टेंबर २०२४ मध्ये पाठीची दुखापत झाली होती, ज्यावर त्याला शस्त्रक्रियाही करावी लागली. त्यातून तो अद्याप तंदुरुस्त झालेला नाही.