Aarti Badade
मासिक पाळी दरम्यान गरम पाण्याने अंघोळ केल्यास पोटातील पेटके आणि स्नायूंचा तणाव कमी होतो. अधिक आरामासाठी सुगंधी तेलाने हलकी मालिश करून मग अंघोळ करा.
Period pain relief tips
sakal
वेदना कमी करण्यासाठी पोटाच्या खालच्या भागाला हलक्या हाताने मालिश करा. तसेच गरम पाण्याच्या पिशवीने (Hot water bag) शेक दिल्यास काही सेकंदात आराम मिळतो.
Period pain relief tips
Sakal
आलं, कॅमोमाइल, पेपरमिंट किंवा बडीशेप यांचा चहा पोटदुखी कमी करण्यासाठी प्रभावी ठरतो. पाळीच्या दिवसात दिवसातून एकदा असा हर्बल चहा नक्की प्या.
Period pain relief tips
Sakal
भरपूर पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेटेड राहते, ज्यामुळे पोट फुगणे (Bloating), गॅस आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो आणि वेदनाही कमी होतात.
Period pain relief tips
Sakal
आहारात केळी, डार्क चॉकलेट, पालेभाज्या (मॅग्नेशियम) आणि अक्रोड (ओमेगा-३) यांचा समावेश करा. हे पदार्थ शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करतात.
Period pain relief tips
Sakal
जास्त मीठ, साखर, कॅफीन (चहा-कॉफी) आणि प्रक्रिया केलेले पदार्थ (Junk Food) खाणे टाळा; कारण यामुळे पोटातील जळजळ आणि वेदना वाढू शकतात.
Period pain relief tips
Sakal
पाळीच्या दिवसात पूर्णपणे झोपून न राहता हलके चालणे किंवा योगासने करा. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि नैसर्गिकरित्या वेदना कमी होण्यास मदत होते.
Period pain relief tips
Sakal