सकाळ डिजिटल टीम
कांद्याचा रस स्कॅल्पमध्ये रक्तप्रवाह वाढवतो व केसांची मुळे मजबूत करतो. आठवड्यातून दोनदा वापरा.
गरम नारळ तेलात कढीपत्ता उकळून केसांना मसाज करा. केस मजबूत व चमकदार बनतात.
आंवळा पावडर किंवा रस केसांवर लावल्यास केस गळती थांबते आणि केस काळे व दाट होतात.
मेथी भिजवून वाटून केसांवर लावा. केसांची मुळे मजबूत होतात आणि डँड्रफही कमी होतो.
अंड्यामध्ये प्रोटीन भरपूर असते. अंड्याचा मास्क केसांवर लावल्याने केस गळती कमी होते.
जास्वंदाच्या फुलांची पेस्ट केसांवर लावा. ही उपाय केस गळती थांबवतो आणि केस वाढीस चालना देतो.
स्कॅल्पमध्ये एलोवेरा जेल लावल्याने सूज कमी होते आणि केस गळती थांबते.
अंडी, बदाम, दही, आणि हिरव्या भाज्या – हे केसांसाठी आवश्यक पोषण देतात.