सकाळ डिजिटल टीम
मानसिक तणावाकडे दुर्लक्ष न करणे, हीच तणाव कमी करण्यासाठीची पहिली पायरी आहे. तणावाचे मूळ कारण समजून घेणे ही पुढची स्टेप.
स्वतःच्या भावना मोकळेपणाने व्यक्त करणे खूप महत्वाचे असते. मनात काही ठेवणे स्वतसाठी त्रासदायक ठरते.
रोज दिवसातून एकदा स्वतःसाठी वेळ देणे गरजेचे आहे.
मेडिटेशन, प्राणायाम यांसारख्या गोष्टी रूटीनचा भाग केल्याने तनाव कमी होतो.
निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवणे, व्यायाम करणे, आध्यात्मिक चिंतन केल्याने आपण फ्रेश होतो व तणावाकडे दुर्लक्ष होते.
बाह्य कारणे किंवा ज्यावर आपले फारसे नियंत्रण नसते. आपण व्यक्त नाही करू शकत असे आंतरिक, मानसिक कारणे तणाव निर्माण करतात.
तणावमुक्त जीवन घालवण्यासाठी तुम्ही काय कराल, याचा विचार जरूर करा.