सकाळ डिजिटल टीम
हळदीचे दूध सर्वांसाठी योग्य नाही, काही लोकांचे आरोग्य बिघडू शकते.
गर्भवती महिलांनी आणि ब्रेस्टफीडिंग करणाऱ्या महिलांनी हळदीचे दूध टाळावे.anemia
अॅनिमिया असलेल्या महिलांनी हळदीचे दूध न पिऊलाही उत्तम, कारण हळदीचे जास्त सेवन लोहाच्या शोषणाला थांबवू शकते.
कमी रक्तदाब असलेल्या रुग्णांनी हळदीचे दूध पिऊ नये, कारण ते रक्तदाब आणखी कमी करू शकते.
दुधाची अॅलर्जी असलेल्या लोकांनी हळदीचे दूध टाळावे, अन्यथा त्यांची प्रकृती बिघडू शकते.
हळदीचे दूध गॅस आणि ब्लोटिंगची समस्या निर्माण करू शकते.
हळदीमध्ये असलेले कर्क्यूमिन मधुमेहाच्या रुग्णांच्या रक्तातील साखरेची पातळी कमी करू शकते. त्यामुळे हळदीचे दूध टाळा.
हळदीचे दूध पिण्यापूर्वी कोणते आजार आहेत हे समजून घ्या आणि सावधगिरीने सेवन करा.