Aarti Badade
मुलांना झोपवताना गोष्टी ऐकवायला किंवा लहान मुलांची गाणी सांगायला हवीत. मोबाईलवर गाणी लावू नका.
मुलांना अंगाई गा किंवा शांतिकर गाणी म्हणून त्यांना आराम द्या.
मुलांचे तळवे कोमट तेलाने हलक्या हाताने मालिश करा, ज्यामुळे त्यांना आराम मिळतो.
मुलांना झोपायच्या आधी हात-पाय धुवून किंवा आंघोळ करून झोपवा.
मुलांच्या झोपेची वेळ निश्चित करा. त्यांना प्रत्येक दिवशी एकसारख्या वेळेस झोपायला सांगा.
मुलांना सकाळीही ठराविक वेळेस उठवायला पाहिजे, ज्यामुळे रात्री लवकर झोपण्याची सवय लागते.
लहान मुलांना दुपारी झोप महत्त्वाची आहे, पण त्यांना जास्त वेळ झोपू देऊ नका.