सकाळ डिजिटल टीम
मोबाइल, लॅपटॉप यांचा वापर मर्यादित ठेवा. अती स्क्रीन टाइममुळे डोळ्यांवर ताण येतो आणि डोकेदुखी होते
आहारात फळे, भाज्या, आणि प्रथिने यांचा समावेश करा. जेवण नियमित वेळेत घ्या आणि कधीही मिस करू नका.
तणाव डोकेदुखीचे एक प्रमुख कारण आहे. योगा, ध्यान, आणि विश्रांतीचे व्यायाम करून तणाव कमी करता येतो.
पुरेसे पाणी प्या. डिहायड्रेशनमुळे डोकेदुखी होऊ शकते.
नियमित व्यायाम करणे डोकेदुखी कमी करण्यास मदत करते.
काही विशिष्ट गोष्टींमुळे डोकेदुखी होऊ शकते. त्या ट्रिगर ओळखून ते टाळण्याचा प्रयत्न करा.
जर डोकेदुखी तीव्र असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने वेदनाशामक औषधे घेऊ शकता.
दररोज रात्री 7-8 तास झोप घेणे महत्त्वाचे आहे. नियमित झोपेची पद्धत ठेवा, म्हणजे दररोज एकाच वेळेस झोपायला जा आणि उठायला जा.