सकाळ डिजिटल टीम
तुम्हाला ही सिगारेट पिण्याची सवय असेल आहे का? ही सवय किती तुमच्या आरेग्यासाठी किती घातक ठरू शकते तुम्हाला माहित आहे का?
एकच सिगारेट तुमच्या आरोग्यास किती घातक ठरु शकते जाणून घ्या.
धूम्रपानामुळे रक्त घट्ट होते, धमन्या अरुंद होतात आणि रक्तदाब वाढतो, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक येण्याची शक्यता वाढते.
धूम्रपान फुफ्फुसांचा कर्करोग, तोंडाचा कर्करोग, घसा आणि अन्ननलिकेचा कर्करोग यांसारख्या अनेक कर्करोगास कारणीभूत ठरू शकते.
सिगारेट फुफ्फुसांना नुकसान करते, ज्यामुळे खोकला, दम आणि इतर श्वासोच्छ्वास समस्या येऊ शकतात.
धूम्रपानामुळे डोळे आणि त्वचेच्या समस्या येऊ शकतात,
धूम्रपान गर्भवती महिलांसाठी धोकादायक आहे, कारण ते बाळाच्या विकासावर परिणाम करू शकते.
धूम्रपान केल्याने शरीर कमकुवत होते आणि शारीरिक कार्यक्षमता कमी होते
सिगारेट ओढणे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. धूम्रपानामुळे अनेक गंभीर आजार होऊ शकतात