एक दिवस झोप घेतली नाही तर शरीरावर काय परिणाम होऊ शकतात?

Monika Shinde

एक दिवस झोप

पुरेशी झोप न मिळाल्यास शरीरावर अनेक नकारात्मक परिणाम होऊ शकतात. एक दिवस झोप न घेतल्यास शरीरात विविध बदल दिसून येतात.

Effects of Sleep Deprivation

|

Esakal

आजारी पडू शकतात

जर तुमची झोप अपुरी असेल, तर शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. त्यामुळे सर्दी, ताप यांसारख्या आजारांना तुम्ही लवकर बळी पडू शकता.

Effects of Sleep Deprivation

|

Esakal

हृदयासंबंधी समस्या

दररोज पाच तासांपेक्षा कमी किंवा नऊ तासांपेक्षा जास्त झोप घेणे टाळावे. झोपेचे दोन्ही टोकाचे प्रकार हृदयविकाराचा धोका वाढवू शकतात.

Effects of Sleep Deprivation

|

Esakal

स्मरणशक्तीवर परिणाम

झोप पूर्ण न झाल्यास विसराळूपणा वाढतो. शिकण्याची आणि गोष्टी लक्षात ठेवण्याची क्षमता कमी होते.

Effects of Sleep Deprivation

|

Esakal

वजन वाढण्याची शक्यता

हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण दररोज पाच तासांपेक्षा कमी झोप घेतल्यास वजन वाढण्याची शक्यता जास्त असते, नियमित झोपेचा वेळ असलेल्या लोकांच्या तुलनेत.

Effects of Sleep Deprivation

|

Esakal

त्वचेच्या समस्या

कमी झोप घेणाऱ्या व्यक्तींमध्ये सुरकुत्या, त्वचेचा रंग असमान होणे तसेच इतर त्वचेच्या समस्या अधिक प्रमाणात दिसून येतात

Effects of Sleep Deprivation

|

Esakal

Vitamin B12: किती व्हिटॅमिन बी१२ आवश्यक? वयानुसार माहिती जाणून घ्या

येथे क्लिक करा