Vitamin B12: किती व्हिटॅमिन बी१२ आवश्यक? वयानुसार माहिती जाणून घ्या

Monika Shinde

हिवाळ्यात व्हिटॅमिन बी१२

हिवाळ्यात थंडीमुळे शरीराची ऊर्जा कमी होते. व्हिटॅमिन बी१२ मज्जातंतु, मेंदू आणि रक्तासाठी अत्यंत आवश्यक आहे. योग्य प्रमाणात नसल्यास थकवा, सुन्नपणा, आणि मुंग्या जाणवू शकतात.

Age-Wise Vitamin B12 Requirement

बी१२ची मुख्य भूमिका

व्हिटॅमिन बी१२ लाल रक्तपेशी तयार करण्यास मदत करते. ऑक्सिजन योग्यरित्या शरीरात पोहोचतो. कमी बी१२मुळे शरीर कमजोर, थकवा जास्त आणि लक्ष केंद्रित करणे कठीण होते.

Age-Wise Vitamin B12 Requirement

हिवाळ्यात दिसणारी लक्षणे

हात-पाय सुन्न होणे, मुंग्या जाणवणे, थकवा, चिडचिडेपणा आणि स्मरणशक्ती कमी होणे ही मुख्य लक्षणे आहेत. हिवाळ्यात थंडीत हे लक्षणे अधिक स्पष्ट होतात.

Age-Wise Vitamin B12 Requirement

जास्त धोका असलेले लोक

शाकाहारी, वृद्ध, डायबिटीज रुग्ण, थायरॉईडचे रुग्ण, कमी सूर्यप्रकाशात राहणारे, औषध घेणारे लोक हिवाळ्यात बी१२च्या कमतरतेस अधिक संवेदनशील असतात.

Age-Wise Vitamin B12 Requirement

वयानुसार बी१२ची गरज

0–6 महिने: 0.4 MCG, 1–3 वर्षे: 0.9 MCG, 9–13 वर्षे: 1.8 MCG, 14 वर्षांपासून: 2.4 MCG, गर्भवती/स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी थोडी अधिक.

Age-Wise Vitamin B12 Requirement

आहारातून बी१२ मिळवणे

दूध, दही, चीज, अंडी, मासे, मांस, फोर्टिफाइड धान्यांचा समावेश करा. शाकाहारी लोकांसाठी फोर्टिफाइड पदार्थ आणि पूरक आवश्यक आहेत.

Age-Wise Vitamin B12 Requirement

डॉक्टरांचा सल्ला

जर तुम्हाला दीर्घकाळ थकवा, हात-पाय सुन्नपणा किंवा लक्ष केंद्रित करण्यास अडचण होत असेल, तर बी१२ टेस्ट करून डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Age-Wise Vitamin B12 Requirement

Freshers Jobs 2026: फ्रेशर्ससाठी करिअरची सुरुवात! या 9 नोकऱ्या लगेच करा अप्लाय

येथे क्लिक करा