Aarti Badade
नेहमीची भुर्जी किंवा ऑम्लेट खाऊन कंटाळा आला असेल, तर पुण्यातील वसुंधरा पाटुकले यांनी सांगितलेला हा 'अंडा घोटाळा' नक्की ट्राय करा.
Special Egg Ghotala
Sakal
यासाठी अंडी, तेल, बटर, जिरे, कांदा, टोमॅटो, आलं-लसूण पेस्ट, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि घरातील नियमित मसाले तयार ठेवावेत.
Special Egg Ghotala
Sakal
सुरुवातीला अंडी उकडून त्यांची टरफले काढून घ्यावीत आणि किसणीच्या साह्याने ती सर्व अंडी बारीक किसून एका बाजूला ठेवावीत.
Special Egg Ghotala
sakal
कढईत तेल आणि बटर गरम करून त्यात जिरे, कांदा, हिरवी मिरची आणि आलं-लसूण पेस्ट घालून कांदा गुलाबी होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यावा.
Special Egg Ghotala
Sakal
परतलेल्या कांद्यात टोमॅटो, हळद, गरम मसाला आणि काळी मिरी पूड घालून थोडे पाणी टाकावे, जेणेकरून मसाला जळणार नाही आणि छान शिजेल.
Special Egg Ghotala
Sakal
मसाल्यात किसलेली अंडी आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करावे, त्यानंतर त्यात वेगळे बनवलेले एक 'अंडा हाफ फ्राय' टाकून ५ मिनिटे मंद आचेवर शिजवावे.
Special Egg Ghotala
Sakal
तयार झालेला हा गरमागरम 'अंडा घोटाळा' प्लेटमध्ये काढून त्यावर पुन्हा एक हाफ फ्राय आणि कोथिंबीर टाकून पावासोबत सर्व्ह करा.
Special Egg Ghotala
Sakal
Chicken Pizza Recipe
Sakal