अंड्याचा शाकशुका कसा बनवायचा? जाणून घ्या सोपी रेसिपी

Apurva Kulkarni

अंड्याचा शाकशुका

अनेकांना अंड्याचे पदार्थ खाण्याची आवड असते. पण तुम्ही कधी अंड्याचा शाकशुका खाल्लाय का? जाणून घ्या रेसिपी...

SHAKSHUKA RECIPE

|

esakal

साहित्य

अंडी, टोमॅटो प्युरी, कांदा, शिमला मिरची, आलं-लसून पेस्ट, तेल, तिखट, मसाले, मीठ, साखर, कोथिंबीर, चीज

SHAKSHUKA INGREDIENTS

|

esakal

कृती

सुरुवातीला एका मोठ्या कढईत तेल गरम करा. त्यात आलं-लसूण पेस्ट परतून घ्या. नंतर कांदा टाकून लाल होऊ द्या.

EGG BREAKFAST IDEAS

|

esakal

मसाले

त्यात बारीक चिरलेली शिमला मिरची घालून ३ मिनिटं परतून घ्या. नंतर हळद, लाल तीखट, मीठ घालून मिस्क करा.

SPICY EGG RECIPE

|

esakal

शिजवून घ्या

त्यात टोमॅटो प्युरी, आणि किंचित साखर घाला (साखऱ एच्छिक आहे) सर्व मिश्रण एकत्र करून थोडं पाणी टाकून मंद आचेवर ५ ते १० मिनिटं शिजवून घ्या.

TOMATO EGG RECIP

|

esakal

अंडे काळजीपूर्वक फोडा

जेव्हा शिजल्यावर, घट्ट झाल्यावर त्यात ३ ते ४ छोटो खड्डे तयार करून घ्या. त्या जागेत थोडासा चीज टाका. त्यावर एक-एक करून अंड काळजीपूर्वक फोडून सोडा.

EGGS IN TOMATO SAUCE

|

esakal

वाफवून घ्या

पॅनवर झाकण ठेवून मंद आजेवर ५ ते ८ मिनिटं अंड्याचा पांढरा भाग होईपर्यंत पुर्णपणे वाफवून घ्या.

HOMEMADE SHAKSHUKA

|

esakal

गार्निशिंग करा

त्यानंतर वरून थोडी कोथिंबीर, काळी मिरी पूड आणि तिखट भुरभरून खायला द्या. तयार आहे 'अंड्याचा शाकशुका'

HOW TO MAKE SHAKSHUKA

|

esakal

TRADITIONAL MAHARASHTRIAN FOOD

|

esakal

हे ही पहा...