Mayur Ratnaparkhe
महान अवकाश वैज्ञानिक विक्रम साराभाई यांच्यासोबत भारताच्या अंतराळ कार्यक्रमाची पायाभरणी करणारे शास्त्रज्ञ एकनाथ वसंत चिटणीस यांचे निधन झाले आहे.
जुलैमध्ये १०० वर्षांचे झालेले पद्मभूषण पुरस्कार विजेते चिटणीस गेल्या काही दिवसांपासून आजारी होते.
केरळमधील थुंबा येथे भारताच्या पहिल्या रॉकेट प्रक्षेपणासाठी जागा निवडण्यात चिटणीस यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
फेब्रुवारी १९६२ मध्ये अहमदाबाद येथील भौतिक संशोधन प्रयोगशाळेत चिटणीस यांच्या उपस्थितीत भारताच्या अंतराळ कार्यक्रमाची पायाभरणी झाली होती.
नासा आणि इस्रो यांच्यातील सहकार्याने सुरू झालेल्या सॅटेलाइट इंस्ट्रक्शनल टेलिव्हिजन एक्सपेरिमेंट (SITE) मध्ये चिटणीस यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
याशिवाय रिमोट सेन्सिंग अॅप्लिकेशन्स स्थापित करण्यातही चिटणीस यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
esakal