Saisimran Ghashi
महाराष्ट्रात सध्या निवडणुकीनंतरचे वारे वाहत असून सत्ता स्थापनेची रणधुमाळी सुरू आहे.
महाराष्ट्रातील राजकारणात माजी मुख्यमंत्री अन् सध्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महत्त्वाचे स्थान आहे.
शिवसेनेचे प्रमुख असलेले, त्यांनी राज्यातील राजकारणात अनेक मोठे बदल केले आहेत. त्यांच्याशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घेऊया.
वयाच्या 18 व्या वर्षी त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता.
एकनाथ शिंदे हे अनिल कपूरचा नायक चित्रपट पाहून राजकारणाबद्दल अधिक प्रेरित झाले होते.
शिंदे यांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात कार्यकर्त्याच्या भूमिकेपासून केली होती. त्यांनी लोकांमध्ये जाऊन, त्यांचे प्रश्न ऐकून आणि त्यांच्यासाठी काम करून शिवसेनेमध्ये आपले स्थान निर्माण केले.
एकनाथ शिंदेचे sun sign कुंभ आहे.
शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात, त्यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमा आंदोलनात भाग घेतल्याबद्दल 40 दिवस तुरुंगात घालवले.