Apurva Kulkarni
7 जून 1975 रोजी एकता कपूरचा जन्म झाला. आज एकता कपूर 50 वर्षांची झाली आहे. टेलिव्हिजनच्या दुनियेत क्रांती घडवणारी ही निर्माता आजही अविवाहित आहे. पण का?
एकताने आजवर लग्न केलं नाही, पण ती एक सिंगल पेरेंट आहे. सरोगसीच्या माध्यमातून एकता कपूरने सिंगल मदर होण्याचा निर्णय घेतला होता.
एका मुलाखतीत एकताने सांगितलं की वडील जितेंद्र यांनी स्पष्ट सांगितलं होतं की, 'लग्न कर, किंवा करिअर निवड!' आणि एकतानं करिअरला प्राधान्य दिलं.
एक वेळ अशी होती जेव्हा एकता कपूरला चंकी पांडेवर क्रश होता. तिने सोशल मीडियावर याचा खुलासा करत म्हटलं होतं 'जर तो हो म्हणाला असता, तर आज मी बॉलिवूड वाइफ असते!'
माध्यमांनुसार, एकता कपूरचं नाव करण जोहर सोबत अनेकदा जोडण्यात आलं आहे. करणने एकदा म्हटलं होतं 'जर कुणी नसेल, तर आम्ही एकमेकांशी लग्न करू!'
आज एकता कपूर अविवाहित असली तरी ती स्वतःच्या आयुष्यावर पूर्ण समाधानी आहे. यशस्वी निर्माती, बिझनेसवुमन आणि आता आई देखील – ती अनेक महिलांसाठी प्रेरणा ठरली आहे.
ज्यांनी इतरांच्या प्रेमकथा लिहिल्या, त्यांची स्वतःची गोष्ट मात्र वेगळीच राहिली. एकता कपूरने प्रेम केलं, पण निवड केली स्वतःच्या स्वप्नांची!