kimaya narayan
निर्माती एकता कपूर उद्या ७ जूनला तिचा पन्नासावा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने जाणून घेऊया तिने संधी दिलेल्या दहा कलाकारांविषयी.
स्त्रीप्रधान चित्रपटसृष्टीचे सत्ताकेंद्र बनण्यापूर्वी, विद्याने 'हम पाँच' या लोकप्रिय मालिकेतील राधिकाची भूमिका निभावली होती. एकताने तिच्यात दडलेली अभिनय सम्राज्ञी पाहिली आणि तिला असा वाव देऊ केला, ज्याचे विद्या बालनने सोने केले.
‘पवित्र रिश्ता’ या लोकप्रिय मालिकेतील लाजाळू, आदर्शवादी मानव ते एक प्रसिद्ध चित्रपट अभिनेता असा ‘एसएसआर’चा प्रवास एकताच्या बॅनरखाली सुरू झाला. एकताने जो विश्वास सुशांतवर दाखवला, त्यातून दूरचित्रवाणीचा आणि चित्रपटसृष्टीचा चेहरा कायमचा बदलून गेला.
कमी बजेट आणि अधिक सृजनशील स्वातंत्र्यासह बनवल्या जाणाऱ्या इंडी सिनेमाचा आणि वास्तववादी सिनेमाचा चेहरा बनण्यापूर्वी राजकुमार राव या गुणी कलावंताने बालाजीच्या ‘लव्ह सेक्स और धोखा’मध्ये काम केले आहे. ही पात्रनिवड अपारंपरिक होती आणि हे लवकरच राजकुमार राव याने सिद्ध केले.
हे खूप कमी लोकांना आठवत असेल की, आयुष्मानच्या चित्रपट कारकिर्दीच्या सुरुवातीला एकताने ‘नौटंकी साला’ या चित्रपटाला समर्थन दिले होते. जगाने त्याला "मार्केटेबल" असे लेबल लावण्यापूर्वी तिने आयुष्मानमधील विक्षिप्तपणा, त्याच्यातील मोहकता आणि गतिमानता व बहुआयामीपणा हेरला.
‘मेरी आशिकी तुम से ही’ ही दूरचित्रवाणी मालिका ते ‘पटाखा’ आणि ‘सना’सारख्या चित्रपटांपर्यंत आपल्या कारकीर्दीचा प्रवास करणाऱ्या राधिकाच्या अभिनयाचे गुण प्रथम बालाजीच्या परिसंस्थेत विकसित झाले.
एकेकाळी चित्रपटसृष्टीच्या विस्मृतीत गेलेले नाव म्हणून ओळख असणाऱ्या रोनित रॉय यांना एकताने 'कसौटी जिंदगी की' आणि 'क्यूँकी सास भी कभी बहू थी' या मालिकेतून पुन्हा पेश केले. त्यानंतर त्यांची कारकीर्द अशी बहरली, ज्यांची कल्पना कुणी केलीही नव्हती.
‘कसम से’पासून सुरुवात केलेल्या प्राचीने ‘रॉक ऑन!!’द्वारे बॉलिवूडमध्ये सहज प्रवेश केला. मोठ्या पडद्यावर स्वतःचे स्थान टिकवून ठेवू शकेल अशी मुलगी शोधणे ही एकताची एक श्रेष्ठ खेळी ठरली.
एकताने स्मृती इराणी यांची केवळ 'क्युँकी...' हा मालिकेत पात्रनिवड केली असे नाही, तर तुलसी ही त्यांनी उभी केलेली व्यक्तिरेखा एक ‘आयकॉन’ बनली. तुलसी ही एक अपूर्व गोष्ट बनली आणि स्मृती इराणी यांचा दूरचित्रवाणी ते संसदेपर्यंतचा उदय तिथूनच सुरू झाला.
हो, ‘बर्फी!’ आणि ‘लुडो’च्या निर्मितीमागचा हा प्रतिभावंत आधी एकताकरता मालिकांचे दिग्दर्शन करत होता. त्यांची सिनेमॅटिक ताकद चित्रपटांमधून रसिकप्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याआधी त्यांच्यातील कथाकथनाचे जादूई कसब एकताच्या लक्षात आले.
‘बालाजी’च्या दैनंदिन मालिकेपासून ते अद्भुत रहस्यपटापर्यंत अशी अनिता यांची कारकीर्द एकता सातत्याने नव्याने घडवीत आहेत. त्यांचे करिअर बहुढंगी अनिताच्या प्रतिभेतून आणि त्यांनी दाखवलेल्या निष्ठेतून बहरत आहे.