हत्तीला राग कधी येतो? जाणून घ्या महत्त्वाची लक्षणे

Yashwant Kshirsagar

मानवाचा मित्र

हत्तींना सामान्यतः मानवांचे मित्र मानले जाते. ते माणसांशी घट्ट नाते निर्माण करण्यास सक्षम असतात आणि अत्यंत सामाजिक व बुद्धिमान प्राणी आहेत.

Aggressive Elephant Behavior

|

esakal

प्रचंड ताकद

त्यांच्या अवाढव्य आकारामुळे आणि प्रचंड ताकदीमुळे हत्ती कोणत्याही प्रतिस्पर्ध्याला सहज पराभूत करू शकतात.

Aggressive Elephant Behavior

|

esakal

रागाचा धोका

हत्तीला राग आला तर परिस्थिती अत्यंत धोकादायक बनते. “जेव्हा मला राग येतो, तेव्हा मी स्वतःचेही ऐकत नाही” असे सिनेमातील डॉयलॉगप्रमाणे म्हणता येईल.

Aggressive Elephant Behavior

|

esakal

हिंस्र कृती

रागावलेले हत्ती गाड्या उलटवून टाकणे, त्यांच्यावर बसणे किंवा मोटारसायकली चिरडून तुकडे करणे यासाठी ओळखले जातात.

Aggressive Elephant Behavior

|

esakal

निसर्गाचे बुलडोझर

जंगलात पाण्याच्या शोधात कळपाने प्रवास करताना किंवा पिल्लांना वाचवताना प्रौढ हत्ती अनियंत्रित होऊ शकतात. त्यामुळे त्यांना ‘निसर्गाचे बुलडोझर’ म्हटले जाते.

Aggressive Elephant Behavior

|

esakal

स्वतःच्या पिल्लावरही राग

काही प्रसंगी हत्ती स्वतःच्याच पिल्लाच्या वागण्यामुळे रागावून त्याला चिरडून टाकतो, असे दुर्मिळ पण घडलेले प्रकार आहेत.

Aggressive Elephant Behavior

|

esakal

‘मस्त’ अवस्था

हत्ती पूर्णपणे अनियंत्रित आणि आक्रमक बनण्याचे मुख्य कारण म्हणजे ‘मस्त’ अवस्था. यात तो महावतावरही हल्ला करून जीव घेऊ शकतो.

Aggressive Elephant Behavior

|

esakal

कालावधी

ही अवस्था काही दिवस ते काही महिने टिकू शकते. प्रौढ नर हत्ती ३ ते ६ महिने, तर तरुण नर (सुमारे १५ वर्षे) १५ दिवस ते एक महिना मस्त अवस्थेत राहू शकतात. जंगली नरांमध्ये जुलै ते डिसेंबर या काळात ती प्रामुख्याने दिसते.

Aggressive Elephant Behavior

|

esakal

एकटा हत्ती जास्त धोका

कळपात एकापेक्षा जास्त नर मस्त अवस्थेत आले तर प्रबळ नर इतरांना कळपाबाहेर हाकलतो. असा एकटा नर अत्यंत आक्रमक आणि धोकादायक बनतो.

Aggressive Elephant Behavior

|

esakal

सावधगिरी आवश्यक

एकटा किंवा मस्त अवस्थेतील हत्ती आढळल्यास विशेष खबरदारी घ्या. निसर्गातील हे शक्तिशाली प्राणी मित्रही असू शकतात आणि भयंकर शत्रूही!

Aggressive Elephant Behavior

|

esakal

मंगळवारी नखे कापावीत की नाही? ज्योतिषशास्त्र काय सांगते?

Nail Cutting on Tuesday

|

esakal

येथे क्लिक करा