मंगळवारी नखे कापावीत की नाही? ज्योतिषशास्त्र काय सांगते?

Yashwant Kshirsagar

हिंदू परंपरेतील दिवसांचे महत्त्व

हिंदू धर्मात आठवड्यातील प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व आहे. हे दिवस आपल्या जीवनशैली आणि भविष्यावर परिणाम करतात, असे मानले जाते.

Nail Cutting on Tuesday

|

esakal

वडीलधाऱ्यांचा सल्ला

घरातील वडीलधारी मंडळी नेहमी सांगतात की मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी नखे कापू नयेत. ही परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आली आहे.

Nail Cutting on Tuesday

|

esakal

ज्योतिषींचा खुलासा

ज्योतिषी यांनी स्पष्ट केले की या विशिष्ट दिवशी नखे कापण्यापासून दूर राहण्यामागे पारंपरिक श्रद्धा तसेच काही वैज्ञानिक आणि ज्योतिषीय कारणे आहेत.

Nail Cutting on Tuesday

|

esakal

वैज्ञानिक दृष्टिकोनही

नखांखालील भाग अत्यंत नाजूक असतो. नखे या नाजूक भागांचे रक्षण करतात. या दिवशी विश्वातील विविध ऊर्जा पृथ्वीवर येतात, असे मानले जाते.

Nail Cutting on Tuesday

|

esakal

ऊर्जा आणि शरीराचा संपर्क

मंगळवार, गुरुवार व शनिवारी येणारी ऊर्जा मानवी शरीराच्या नाजूक भागांशी संपर्क साधल्यास नकारात्मक परिणाम होऊ शकतात, असा दावा केला जातो.

Nail Cutting on Tuesday

|

esakal

गुरुवार

गुरुवार हा देवांचे गुरू बृहस्पती (गुरु ग्रह) यांना समर्पित आहे. या दिवशी नखे कापल्याने गुरु ग्रह कमकुवत होतो, असे ज्योतिषशास्त्र सांगते.

Nail Cutting on Tuesday

|

esakal

सुख, शांती आणि बुद्धीगुरु

ग्रह कमकुवत झाल्यास आयुष्यातील सुख-शांती कमी होऊ शकते. गुरु ग्रह बुद्धीचा कारक असल्याने नखे किंवा केस कापल्याने बौद्धिक क्षमतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो, असा विश्वास आहे.

Nail Cutting on Tuesday

|

esakal

मंगळवार

मंगळवार हा मंगळ देवतेशी संबंधित आहे. मंगळाचा संबंध मानवी रक्ताशी जोडला जातो. या दिवशी नखे कापल्याने आत्मविश्वास कमी होतो, असे म्हटले जाते.

Nail Cutting on Tuesday

|

esakal

शनिवार

शनिवार शनी देवाला समर्पित आहे. या दिवशी नखे कापल्याने शनी देव नाराज होऊ शकतात. त्यामुळे आयुष्य कमी होणे आणि आर्थिक अडचणी येणे यांसारखे परिणाम होऊ शकतात, असा समज आहे.

Nail Cutting on Tuesday

|

esakal

मांजर मध्यरात्री का रडते? जाणून घ्या नेमकं काय असतो संकेत?

Why Cats Cry At Night

|

esakal

येथे क्लिक करा