Yashwant Kshirsagar
सध्या ऑक्टोबर हिटमुळे तापमानात वाढ पाहायला मिळत आहे. तापमानात थोडीशी जरी वाढ झाली, तरी माणसे आणि प्राणी या दोघांनाही घाम फुटतो.
Elephant Sweating Facts
esakal
मात्र, हत्ती हा अशा काही मोजक्या प्राण्यांपैकी एक आहे ज्यांना प्रचंड उष्णतेतही घाम येत नाही. यामागील वैज्ञानिक कारण आपण समजून घेऊया.
Elephant Sweating Facts
esakal
जेव्हा माणसांना उष्णता जाणवते, तेव्हा त्वचेखालील घर्मग्रंथींमधून पाणी बाहेर पडते. या प्रक्रियेलाच 'घाम येणे' असे म्हणतात.
Elephant Sweating Facts
esakal
घाम आल्यामुळे शरीराचे वाढलेले तापमान कमी होऊन ते पुन्हा सामान्य पातळीवर येते आणि शरीराला थंडावा मिळतो.
Elephant Sweating Facts
esakal
हत्तींच्या त्वचेखाली घर्मग्रंथी नसतात; त्याऐवजी, त्यांचे कान आणि शरीरावरील त्वचेला अनेक भेगा आणि खाचा असतात.
Elephant Sweating Facts
esakal
हत्तींचे कान खूप मोठे असतात आणि त्यात रक्तवाहिन्यांचे जाळे पसरलेले असते.
Elephant Sweating Facts
esakal
जेव्हा हत्ती आपले कान हलवतात, तेव्हा त्या रक्तवाहिन्यांमधून वाहणारे रक्त हवेच्या संपर्कात आल्यामुळे थंड होते. या प्रक्रियेला 'थर्मोरेग्युलेशन' (तापमान नियंत्रण) असे म्हणतात. म्हणूनच हत्तींना घाम येत नाही.
Elephant Sweating Facts
esakal
Rani Karnavati History
esakal