Anushka Tapshalkar
चालणे हे वजन कमी करण्यासाठी सर्वात सोपे आणि प्रभावी व्यायाम मानले जाते, कारण ते कुठेही आणि कोणत्याही वेळी करता येते.
वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांसाठी चालणे हा एक प्रभावी उपाय मानला जातो.
या साध्या शारीरिक क्रियेमुळे केवळ वजन नियंत्रणात राहते असे नाही, तर संपूर्ण आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो आणि मानसिक व शारीरिक आरोग्य सुधारते.
उपाशी पोटी चालणे, विशेषतः नाश्त्यापूर्वी, चरबी जाळण्यास मदत करते आणि चयापचय (metabolism) वाढवते. यामुळे मन प्रसन्न जपून ताजेतवाने वाटते आणि दिवसाची सुरुवात उत्साहाने होते.
जेवणानंतर चालल्याने पचनसंस्थेचे आरोग्य सुधारते आणिअन्न व्यवस्थित पचते. तसेच रक्तातील साखर संतुलित ठेवते आणि अतिरिक्त कॅलरी जाळून वजन कमी करण्यास मदत करते. त्यामुळे ही एक आरोग्यदायी सवय आहे.
आधी सांगितल्या प्रमाणे उपाशी पोटी चालणे किंवा जेवणानंतर चालणे, दोन्ही प्रकारचे चालणे वजन कमी करण्यास फायदेशीर आहे.
कोणता पर्याय निवडायचा हे तुमच्या जीवनशैलीवर आणि आरोग्याच्या गरजेनुसार अवलंबून आहे.
परंतु योग्य परिणाम दिसण्यासाठी सातत्य असणे महत्त्वाचे आहे.
तुमची त्वचा संवेदनशील असल्यास किंवा काही वैद्यकीय अडचणी असल्यास, वापराआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.