इराणमध्ये किती हिंदू आहेत? त्यांची तिथे अवस्था कशीय?

संतोष कानडे

इराण

इराण हे मुस्लिम राष्ट्र आहे. तिथे मुस्लिमांच्या शिया समुदायाचे बहुसंख्य लोक राहतात.

हिंदू

इराणमध्ये हिंदूंची संख्या अतिशय अल्प आहे. शेकडो वर्षांपूर्वी व्यापाराच्या निमित्ताने गेलेले लोक तिथेच राहिले.

व्यावसायिक

इराणमध्ये दोन प्रकारचे हिंदू राहतात, एक भारतीय व्यावसायिक आणि कामगार. हे तिथे विविध प्रकल्पांवर तात्पुरत्या स्वरुपात काम करतात.

स्थानिक हिंदू

आणि दुसरे म्हणजे स्थानिक हिंदू लोक. फाळणीपूर्वी आणि त्यानंतरच्या काही काळात पंजाब आणि सिंधमधून मोजके लोक जाहेदान सारख्या शहरांमध्ये गेले.

मुस्लिम

इराणच्या संविधानानुसार केवळ मुस्लिम, ख्रिश्चन, ज्यू आणि झोरोस्ट्रियन म्हणजे पारशी धर्मांना अधिकृत मान्यता आहे.

अल्पसंख्याक

हिंदू धर्माला इराणध्ये अधिकृत धार्मिक अल्पसंख्याक म्हणून दर्जा मिळालेला नाही. हिंदू लोक खासगी स्वरुपात सणोत्सव साजरे करतात.

तेहरान

हिंदू धर्माचा प्रचार किंवा मोठ्या मिरवणुका काढण्यास कायद्यानुसार मर्यादा आहेत. तेहरानमध्ये एक हिंदू मंदिर आहे, तिथे लोक उपासना करतात.

राजकीय संबंध

इराण आणि भारताचे राजकीय संबंध मजबूत असल्याने तिथल्या भारतीयांना सरकारकडून संरक्षण मिळतं.

भारताची संस्कृती

इराणी लोकांचे भारतीयांबद्दलची मतं चांगली आहेत. भारताची संस्कृती, खाद्य, बॉलिवूड तिथे लोकप्रिय आहे.

खामेनेई यांच्या रिंगबद्दल हे गुपित माहितंय का?

<strong>येथे क्लिक करा</strong>