Pranali Kodre
इंग्लंड विरुद्ध भारत संघात २० जूनपासून पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना हेडिंग्लेमध्ये झाला.
या सामन्यातून शुभमन गिलच्या कर्णधारपदाच्या कार्यकाळालाही सुरुवात झाली.
या सामन्यात गिलने पहिल्याच डावात २२७ चेंडूत १९ चौकार आणि १ षटकारासह १४७ धावांची खेळी केली.
त्यामुळे गिलची ही खेळी इंग्लंडमध्ये कसोटीत भारतीय कर्णधार म्हणून केलेली चौथ्या क्रमांकाची सर्वोच्च धावांची खेळी ठरली.
भारतीय कर्णधार म्हणून इंग्लंडमध्ये कसोटीत सर्वोच्च धावांची खेळी करण्याचा विक्रम मोहम्मद अझरुद्दीनच्या नावावर आहे. त्याने मँचेस्टरमध्ये १९९० मध्ये १७९ धावांची खेळी केली होती.
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर विराट कोहली असून त्याने बर्मिंगहॅमध्ये २०१८ साली १४९ धावांची खेळी केली होती.
तिसऱ्या क्रमांकावर मन्सूर अली खान पतौडी असून त्यांनी १९६७ साली लीड्समध्ये १४८ धावांची खेळी केली होती.
चौथ्या क्रमांकावर गिल असून पाचव्या क्रमांकावर सौरव गांगुली आहे. त्याने लीड्समध्ये २००२ साली १२८ धावांची खेळी केली होती.