सकाळ डिजिटल टीम
‘सैराट’मधील आर्चीची भूमिका साकारत 2016 मध्ये मराठी सिनेसृष्टीत दमदार प्रवेश करणारी रिंकू राजगुरू आजही प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री आहे.
Rinku Rajguru Photo Viral
esakal
पदार्पणातील तिची साधी-भोळी प्रतिमा चाहत्यांच्या मनात घट्ट रुजली असून, ती आजही अनेकांसाठी ‘आर्ची’च आहे.
Rinku Rajguru Photo Viral
esakal
अलीकडेच, रिंकूने आपल्या इन्स्टाग्रामवर काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा साधेपणा आणि नैसर्गिक सौंदर्य स्पष्टपणे दिसून येत आहे.
Rinku Rajguru Photo Viral
esakal
या फोटोशूटमध्ये तिने एक साधा, सुती वनपीस परिधान केलाय. मोकळे केस, चेहऱ्यावर कुठलाही मेकअप नाही असा अगदी नैसर्गिक लूक तिनं ठेवला आहे. हा नो मेकअप लूक पाहून चाहते अक्षरशः भारावून गेले आहेत.
Rinku Rajguru Photo Viral
esakal
फोटो शेअर करताना रिंकूने ‘दिल है छोटासा, छोटीसी आशा…’ हे गाणं वापरलं आहे.
Rinku Rajguru Photo Viral
esakal
खास म्हणजे, तिचा आगामी ‘आशा’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याने हे गाणं पोस्टला अगदी योग्य साज चढवताना दिसत आहे.
Rinku Rajguru Photo Viral
esakal
रिंकूचा ‘आशा’ हा सिनेमा 19 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
Rinku Rajguru Photo Viral
esakal
या चित्रपटात ती आशासेविकेची भूमिका साकारत असून तिच्या नव्या भूमिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.
Rinku Rajguru Photo Viral
esakal
या लेटेस्ट फोटोंसोबत रिंकूने छोटंसं पण अर्थपूर्ण कॅप्शनही दिलं आहे, ‘हास्य, आशा आणि कृतज्ञता’. या कॅप्शनवर चाहते रिअॅक्ट होत आहेत.
Rinku Rajguru Photo Viral
esakal
रिंकू अनेकदा साडी आणि पारंपरिक पोशाखातील फोटो शेअर करत असते. तिचं इंडियन लूकवरील प्रेम सर्वांना माहिती आहे. पण, या साध्या आणि नैसर्गिक लूकमध्येही ती तितकीच सुंदर दिसत आहे.
Rinku Rajguru Photo Viral
esakal
Importance of Kovidar Tree
esakal