Sandip Kapde
डोंगराच्या कुशीत आणि खोल दरीच्या तळाशी वसलेले हे गाव निसर्गरम्य परिसरामुळे विशेष लक्ष वेधून घेते. चारही बाजूंनी डोंगर, दऱ्या आणि हिरवाईने वेढलेल्या या गावाचे सौंदर्य पाहण्यासारखे आहे.
A Village That Becomes Empty After Sunset
esakal
गावात प्रवेश करताच आजूबाजूला शांतता आणि माणसांची कमी वर्दळ जाणवते. गावातील बहुतांश घरे बंद असून, काही घरांमध्ये केवळ जनावरांचा वावर दिसून येतो.
A Village That Becomes Empty After Sunset
esakal
गावात साधारण तेरा घरे असल्याचे दिसून येते. यातील अनेक घरे मातीची आणि दगडांची बांधलेली असून, काही घरांची अवस्था अत्यंत जीर्ण झाली आहे.A Village That Becomes Empty After Sunset
A Village That Becomes Empty After Sunset
esakal
काही वर्षांपूर्वी गावातील कुटुंबांनी येथून जवळपास दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या उंच भागात नवीन वस्ती निर्माण केली आहे. त्यामुळे जुने गाव हळूहळू निर्मनुष्य झाले आहे.
A Village That Becomes Empty After Sunset
esakal
गावातील काही नागरिक आजही दिवसा जुन्या वस्तीत येतात. शेतीची कामे करणे, जनावरे चारणे आणि गवत गोळा करणे यासाठी त्यांचा या परिसरात वावर असतो.
A Village That Becomes Empty After Sunset
esakal
दिवसभर माणसांची ये-जा असली तरी संध्याकाळ होताच गावातील नागरिक नवीन वस्तीकडे परततात. त्यामुळे सूर्यास्तानंतर जुन्या गावात जवळपास कोणीही राहत नाही.
A Village That Becomes Empty After Sunset
esakal
गावातील जुन्या घरांमध्ये आजही जनावरांना बांधण्याची व्यवस्था आहे. नागरिक नवीन वस्तीत राहायला गेले असले तरी शेती आणि जनावरांच्या देखभालीसाठी त्यांचे जुन्या गावाशी नाते कायम आहे.
A Village That Becomes Empty After Sunset
esakal
गावात पाण्याची व्यवस्था आजही उपलब्ध आहे. जुन्या वस्तीत पाण्यासाठी नळाची सुविधा असून, नागरिक त्याचा वापर शेती आणि इतर कामांसाठी करतात.
A Village That Becomes Empty After Sunset
esakal
गावाच्या खालच्या बाजूला नागरिकांची शेती आहे. गहू आणि इतर पिकांच्या माध्यमातून कुटुंबांच्या उदरनिर्वाहासाठी शेती महत्त्वाची भूमिका बजावते.
A Village That Becomes Empty After Sunset
esakal
गावात पोहोचण्यासाठीचा रस्ता अत्यंत अवघड आणि धोकादायक आहे. तीव्र उतार, खोल दरी आणि पायवाटेचा आधार घेत नागरिकांना ये-जा करावी लागते.
A Village That Becomes Empty After Sunset
esakal
या परिसरातील एका धोकादायक वळणावर पूर्वी मोठा अपघात घडल्याची स्थानिक आख्यायिका आहे. त्यानंतर गावात विचित्र दुर्घटना घडू लागल्याच्या समजुतीतून येथे देवीचे मंदिर उभारण्यात आल्याचे सांगितले जाते.
A Village That Becomes Empty After Sunset
esakal
डोंगराच्या कुशीत वसलेली जुनी घरे, सूर्यास्तानंतर पसरणारी भयाण शांतता, अवघड पायवाटा आणि आजही शेतीसाठी येथे येणारे नागरिक यामुळे हे गाव वेगळीच ओळख निर्माण करते. उत्तराखंडमधील चंपावत जिल्ह्यात असलेले हे गाव म्हणजे Swala गाव!
A Village That Becomes Empty After Sunset
esakal
Where Is Cedar Falls Located in America?
esakal