अमेरिकेतील खेडेगाव कसे असते?

Sandip Kapde

विस्तार –

अमेरिकेतील आयोवा राज्यातील सीडर फॉल्स हे सुमारे २० ते ३० हजार लोकसंख्या असलेले टुमदार आणि सुंदर गाव आहे.

Where Is Cedar Falls Located in America?

|

esakal

स्वच्छता –

गावातील रस्ते, चौक आणि सार्वजनिक परिसर अत्यंत स्वच्छ असून ठिकठिकाणी कचराकुंड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

Where Is Cedar Falls Located in America?

|

esakal

बँक –

गावात सुमारे ५० वर्षांपूर्वी स्थापन झालेली जुनी सहकारी बँक असून ती स्थानिक नागरिकांच्या आर्थिक व्यवहारांसाठी महत्त्वाची आहे.

Where Is Cedar Falls Located in America?

|

esakal

वाचनालय –

गावात मोठे सार्वजनिक वाचनालय असून नागरिकांना नोंदणी करून विनामूल्य पुस्तके वाचण्याची सुविधा उपलब्ध आहे.

Where Is Cedar Falls Located in America?

|

esakal

इंधन –

गावातील पेट्रोल पंपावर नागरिक स्वतःच्या हाताने वाहनांमध्ये इंधन भरतात आणि पेट्रोलचे दर दर्शविणारे फलक रस्त्याच्या कडेला लावलेले असतात.

Where Is Cedar Falls Located in America?

|

esakal

वस्ती –

गावातील घरे सुंदर आणि सुटसुटीत असून मुख्य वस्तीच्या सभोवताली मोठ्या प्रमाणात मोकळी जमीन आणि मक्याची शेती दिसते.

Where Is Cedar Falls Located in America?

|

esakal

बाजारपेठ –

गावाचे मुख्य केंद्र असलेल्या डाउनटाउन परिसरात हॉटेल्स, कॉफी शॉप, रेस्टॉरंट्स आणि विविध व्यावसायिक आस्थापना आहेत.

Where Is Cedar Falls Located in America?

|

esakal

नाट्यगृह –

गावातील ऐतिहासिक कॉटन थिएटरची उभारणी १९१० मध्ये झाली असून येथे नागरिकांसाठी नाटकांचे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

Where Is Cedar Falls Located in America?

|

esakal

नदी –

गावातून वाहणाऱ्या नदीवर पूल बांधण्यात आला असून नदीच्या परिसरात फिरण्यासाठी आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी सुंदर वातावरण आहे.

Where Is Cedar Falls Located in America?

|

esakal

वाहतूक –

गावातील रस्त्यांवर वाहनांची वर्दळ कमी असून वाहतूक नियमांचे काटेकोर पालन केले जाते. पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी स्वतंत्र बटणांची सुविधाही आहे.

Where Is Cedar Falls Located in America?

|

esakal

उद्यान –

१८५३ मध्ये उभारण्यात आलेल्या ओव्हरमन पार्कमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, संगीताचे कार्यक्रम आणि नागरिकांच्या मनोरंजनासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे.

Where Is Cedar Falls Located in America?

|

esakal

शांतता –

गावात मोठ्या शहरांच्या तुलनेत वाहतूक कोंडी आणि गोंगाट कमी असून मोकळे रस्ते, हिरवळ, शेती आणि निसर्गरम्य परिसरामुळे शांत वातावरण अनुभवायला मिळते.

Where Is Cedar Falls Located in America?

|

esakal

पुणे जिल्ह्यात Hidden गाव सापडलं, फक्त चार माणसे कसे राहतात? 

Where Is Khanu Village Located in Pune District?

|

esakal

येथे क्लिक करा