EPFOने बदलले PFचे ८ नियम, पैसे काढण्यापासून ते नॉमिनेशन आणि क्लेमबाबत मोठे अपडेट्स

सूरज यादव

ईपीएफओ

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ईपीएफओने EPF, EPS आणि EDLI योजना २०२६ अंतर्गत पीएफशी संबंधित नियमात महत्त्वाचे बदल केले आहेत.

EPFO

|

Esakal

कंपनी-कर्मचारी योगदान

नव्या नियमानुसार कर्मचाऱ्यासाठी बेसिक वेतनाच्या १२ टक्के योगदान असेल तर कंपनीचे योगदानही नियमानुसार असेल.

EPFO

|

Esakal

पीएफ वेतन मर्यादा

ईपीएफ योजनेत थेट १५ हजार वेतन मर्यादेचा उल्लेख होता. आता नव्या नियमानुसार वेतन मर्यादा केंद्र सरकार वेळोवेळी जाहीर करणार आहे.

EPFO

|

Esakal

पैसे काढण्याचे नियम

ईपीएफओतून पैसे काढण्यासाठी तीन कॅटगरी केल्या आहेत. त्यात आवश्यक गरजा, कुटुंब-घराशी संबंधित आणि आपत्कालीन विशेष परिस्थिती यांचा समावेश आहे.

EPFO

|

Esakal

किमान रक्कम

पीएफ खात्यात किमान रक्कम २५ टक्के असणं बंधनकारक आहे. पात्र खातेधारक पीएफच्या ७५ टक्के रक्कम काढू शकणार आहेत. पूर्ण रक्कम काढण्यासाठी परवानगी नाही.

EPFO

|

Esakal

पैसे काढण्याचे नियम

नव्या नियमानुसार पीएफ काढण्यासाठी किमान १२ महिन्यांची सेवा पूर्ण करणं आवश्यक आहे. वैद्यकीय कारणासाठीही १२ महिन्यांची अट आहे.

EPFO

|

Esakal

नोकरीनंतर

पीएफची संपूर्ण रक्कम काढण्यासाठी नोकरी सोडल्यानंतर आता १२ महिने वाट बघावी लागेल. तर पात्र ठरल्यानंतर आंशिक रक्कम काढण्यासाठीही ३६ महिने वेटिंग पीरियड असेल.

EPFO

|

Esakal

नॉमिनेशन

ईपीएफओकडून नॉमिनेशन प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आलीय. यामुळे कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना भविष्यात पीएफचा लाभ सहज मिळू शकेल.

EPFO

|

Esakal

पीएफ क्लेम

नव्या नियमानुसार पीएफ दावा निकाली काढण्याची मर्यादा २० दिवस करण्यात आलीय. जर उशीर झाला तर ईपीएफओला १२ टक्क्यांच्या दराने पेनल व्याजदर द्यावा लागेल.

EPFO

|

Esakal

Missing Linkच्या बोगद्यात Speed Limit आहे का?

No Entry for Heavy Vehicles on Missing Link

|

sakal

इथं क्लिक करा