मिसिंग लिंकच्या बोगद्यात Speed Limit आहे का?

Anushka Tapshalkar

मुंबई-पुणे मिसिंग लिंक

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित करण्यासाठी ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प उभारण्यात आला आहे. या मार्गावर बोगद्याचाही समावेश आहे.

Mumbai Pune Missing Link

|

sakal

बोगद्यात भीषण अपघात

शुक्रवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास मिसिंग लिंकच्या बोगद्यात भीषण अपघात झाला. भरधाव फॉर्च्युनरने आयशर ट्रकला मागून धडक दिल्याने हा अपघात घडला.

Mumbai Pune Missing Link Tunnel Car Accident

|

sakal

एकाचा जागीच मृत्यू, सहा जखमी

या अपघातात पिंपरी-चिंचवडमधील वाकड येथील तरुण व्यावसायिकाचा जागीच मृत्यू झाला. तर सहा जण जखमी झाले. धडकेनंतर फॉर्च्युनरचा अक्षरशः चक्काचूर झाला.

Death in Missing Link Tunnel Car Accident

|

sakal

मिसिंग लिंकवर प्रवेशबंदी, तरीही वाहतूक?

मिसिंग लिंकवर सध्या पूर्ण प्रवेशबंदी असतानाही जड-अवजड वाहने या मार्गावरून जात असल्याचा मुद्दा समोर आला आहे. वाहतूक रोखण्यासाठी दिशादर्शक फलकांव्यतिरिक्त पुरेशा उपाययोजना आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

No Entry for Heavy Vehicles on Missing Link

|

sakal

मग बोगद्यात Speed Limit किती?

मिसिंग लिंकच्या बोगद्यात वाहनांच्या वेगावर मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे बोगद्यातून प्रवास करताना वाहनचालकांना निर्धारित वेगमर्यादेचे पालन करणे आवश्यक आहे.

What is the Speed Limit in Missing Link Tunnel

|

sakal

हलकी वाहने

नियमांनुसार, बोगद्यात हलक्या मोटार वाहनांसाठी कमाल वेगमर्यादा ताशी 100 किमी निश्चित करण्यात आली आहे.

Speed Limit for Light Vehicles

|

sakal

बस आणि प्रवासी वाहने

तर बसेस आणि प्रवासी वाहनांसाठी बोगद्यात कमाल वेगमर्यादा ताशी 80 किमी निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे बोगद्यात वेगावर नियंत्रण ठेवणे आणि वाहतूक नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे.

Speed Limit for Heavy Vehicles

|

sakal

एक-दोन नाही... 'इतक्या' चलनानंतर आता लायसन्सवर होणार कारवाई

Driving License Cancellation Rule

|

sakal

आणखी वाचा