सकाळ डिजिटल टीम
माशांचे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत. तसेच प्रत्येक माशाचा जीवनकाल हा वेगळा आहे.
काही मासे फक्त काही महिने किंवा वर्षे जगतात, तर काही मासे 100 वर्षांपेक्षा जास्त काळ जगू शकतात.
जगभरात 32,000 पेक्षा जास्त माशांच्या प्रजाती आहेत.
माशांचे प्रकार व त्यांचा जीवनकाल कसा असतो जाणून घ्या.
अनेक गोड्या पाण्याचे मासे 1-3 वर्षे जगतात.
रफआय रॉकफिश 205 वर्षांपर्यंत जगू शकते.
काही मासे लहान असतात आणि लवकर मरतात, तर काही मासे मोठे असतात आणि जास्त काळ जगतात.