सकाळ डिजिटल टीम
प्रसूतीनंतर शरीरातील लोह वाढवण्यासाठी डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या घेतल्या पाहिजेत. ह्या गोळ्या आई आणि बाळासाठी उपयुक्त असतात.
आहारात हिरव्या पालेभाज्या, डाळी, नाचणी, मासे आणि मटन समाविष्ट करा. यामुळे आईच्या शरीराला आवश्यक पोषण मिळते.
डॉक्टरांच्या सूचनेनुसार कॅल्शियम गोळ्या घ्या, तसेच दुध आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करा.
प्रसूतीनंतर ओटीपोट आणि कंबरेचा वेदना वाढू शकतात, त्यामुळे चहा, कॉफी आणि मसालेदार पदार्थ कमी करा.
विविध फळे खाणे खूप फायदेशीर आहे. फळात खनिज, जीवनसत्त्व आणि फायबर असतात, जे शरीरासाठी आवश्यक आहेत.
सुकामेवा नियमितपणे खाणे उपयुक्त असते. काळे मनुके आणि भिजवलेले बदाम पोटाची सफाई आणि शक्ती वाढवण्यास मदत करतात.
जिरे आणि ओवा पचनक्रियेला सुधारतात. जेवल्यानंतर बडीशेप खाणे पचनाच्या समस्या दूर करतो.
मेथीचे दाणे, तीळ आणि डिंकाचे लाडू शरीरातील झीज भरून काढतात आणि शक्ती वाढवतात. पण त्याचे प्रमाण योग्यप्रमाणात असले पाहिजे.