सकाळ डिजिटल टीम
प्रवासाच्या उद्देशाची आणि कालावधीची स्पष्टता ठरवा. प्रवासासाठी योग्य स्थळ निवडा आणि तिथल्या हवामान कसे आहे हे आधीच जाणून घ्या. तिकिटे आणि राहण्याची व्यवस्था आधीच बुक करा.
हलके आणि आरोग्यदायी खाद्यपदार्थ बरोबर ठेवा. गरम पाणी, सॅनिटायझर आणि प्राथमिकोपचार पेटी सोबत ठेवा. भरपूर पाणी प्या आणि पुरेशी झोप घ्या.
फक्त आवश्यक वस्तूच बॅगमध्ये पॅक करा. हवामानानुसार कपडे ठेवा. हलकी बॅग ठेवा आणि पावर बँक, हेडफोन्स, चार्जर आणि कॅमेरा विसरू नका.
ओळखपत्र, तिकीट, हॉटेल बुकिंग, विमा पॉलिसी आणि इतर आवश्यक कागदपत्रांची डिजिटल प्रत ठेवा. परदेशी जाणार असाल तर, पासपोर्ट आणि व्हिसाची तयारी करा.
गर्दीच्या ठिकाणी सावध रहा. आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या आणि अनोळखी व्यक्तींवर लगेच विश्वास ठेऊ नका.
गुगल मॅप्स, ट्रिप प्लॅनर आणि ट्रॅव्हल ऍप्सचा वापर करा. सार्वजनिक वाहतूक, टॅक्सी किंवा रेंटल वाहनांची माहिती आधीच घ्या.