केस गळती थांबवायची असेल तर 'ही' जीवनसत्त्वे शरीरात असायलाच हवीत

Anushka Tapshalkar

केस गळतीचं मूळ कारण पोषणात दडलंय

ताण, अनुवंशिकता यासोबतच शरीरात आवश्यक जीवनसत्त्वे व खनिजांची कमतरता असेल, तर केस वेगाने गळू लागतात.

व्हिटॅमिन A

व्हिटॅमिन A केसांच्या मुळांची वाढ आणि टाळूतील नैसर्गिक तेल (Sebum) तयार करण्यास मदत करतं. गाजर, रताळं, पालक यामध्ये मुबलक प्रमाणात आढळतं.

B-विटॅमिन्स व बायोटिन

बायोटिन (B7) आणि B12 केस तुटणं व पातळ होणं रोखतात. अंडी, कडधान्ये, बिया, दूध व फोर्टिफाइड धान्ये उपयुक्त.

Vitamin B

|

sakal

व्हिटॅमिन D

व्हिटॅमिन D कमी असल्यास केस गळती वाढू शकते. सूर्यप्रकाश, अंडी, फॅटी फिश आणि फोर्टिफाइड दूध यामुळे पातळी संतुलित राहते.

Vitamin D

|

sakal

व्हिटॅमिन E

ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करून केसांच्या मुळांना संरक्षण देतं. बदाम, बिया आणि पालक हे उत्तम स्रोत आहेत.

Vitamin E

|

sakal

आयर्न व झिंक

आयर्नची कमतरता विशेषतः महिलांमध्ये केस गळती वाढवते. झिंक केसांच्या ऊती दुरुस्त करतं. पालक, डाळी, भोपळ्याच्या बिया, काजू उपयुक्त.

संतुलन महत्त्वाचं

गरजेपेक्षा जास्त जीवनसत्त्वे घेतल्यास उलट केस गळती वाढू शकते. आहारातून पोषण घ्या आणि सप्लिमेंट्स घेण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

दूधापेक्षाही जास्त कॅल्शियम असतं तीळात; खाण्याचे फायदे एकदा वाचाच

Sesame Seeds Have More Calcium than Milk

|

sakal

आणखी वाचा