नदी आटली अन् 80 वर्षांपूर्वीचं रहस्य बाहेर! दुसऱ्या महायुद्धातील जहाजं, शस्त्रास्त्रं दिसू लागली

Sandip Kapde

जलसंकट:

युरोपात यंदा शतकातील सर्वाधिक भीषण उष्णता आणि दुष्काळामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Drought Reveals Warship Relics

|

esakal

पाणीपातळी:

युरोपातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब डॅन्यूब नदीची पाणीपातळी ऐतिहासिक नीचांकी पातळीवर पोहोचली आहे.

Drought Reveals Warship Relics

|

esakal

जहाजे:

नदीचे पाणी आटल्याने दुसऱ्या महायुद्धाच्या काळात बुडवलेली डझनभर जर्मन युद्धनौका तब्बल ८० वर्षांनंतर पुन्हा दिसू लागली आहेत.

Drought Reveals Warship Relics

|

esakal

अवशेष:

नदीच्या तळाशी सुमारे २०० जहाजांचे अवशेष असल्याचा अंदाज असून, त्यापैकी २० हून अधिक जहाजे स्पष्टपणे दिसत आहेत.

Drought Reveals Warship Relics

|

esakal

स्फोटके:

या जहाजांमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि दारूगोळा असल्याने स्थानिक नागरिक तसेच जलवाहतुकीसाठी गंभीर धोका निर्माण झाला आहे.

Drought Reveals Warship Relics

|

esakal

वाहतूक:

नदीतील पाण्याची पातळी घटल्याने जहाजांच्या वाहतुकीचा मार्ग केवळ १०० मीटरपर्यंत मर्यादित झाला आहे.

Drought Reveals Warship Relics

|

esakal

व्यापार:

जलवाहतुकीवर आलेल्या निर्बंधांमुळे आंतरराष्ट्रीय व्यापार आणि मालवाहतुकीचे मोठे नुकसान होत आहे.

Drought Reveals Warship Relics

|

esakal

शेती:

४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानामुळे युरोपातील शेतकरी दिवसा काम करण्याऐवजी रात्री शेतात काम करत आहेत.

Drought Reveals Warship Relics

|

esakal

उष्णता:

दिवसभर तीव्र उष्णता आणि उष्ण वाऱ्यांमुळे बाहेरील काम करणे अत्यंत कठीण झाले आहे.

Drought Reveals Warship Relics

|

esakal

नुकसान:

ब्रिटनमध्ये गेल्या सुमारे दोन महिन्यांतील उष्णतेच्या लाटेमुळे अर्थव्यवस्थेला अंदाजे ५.७ लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

Drought Reveals Warship Relics

|

esakal

उत्पादकता:

प्रचंड उष्णतेमुळे कामकाजावर परिणाम होऊन कर्मचाऱ्यांची उत्पादकता घटली आहे.

Drought Reveals Warship Relics

|

esakal

परिणाम:

अनेक कर्मचाऱ्यांना उष्णतेमुळे कामाचे तास कमी करून वेळेआधी घरी परतावे लागले असून, हवामान संकटाचा व्यापक आर्थिक परिणाम दिसत आहे.

Drought Reveals Warship Relics

|

esakal

शिवरायांच्या काळातील व्यापाऱ्यांना कोणत्या सवलती मिळायच्या? 

How Shivaji Maharaj Supported Traders and Boosted Trade in the Maratha Era

|

esakal

येथे क्लिक करा