Monika Shinde
महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृती फक्त स्वादिष्ट जेवणापुरती मर्यादित नाही, तर संध्याकाळच्या गरम चहा सोबत खाण्यासाठीही अनेक चविष्ट व पारंपरिक पदार्थ देणारी आहे. चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रीयन स्नॅक्स जे चहा बरोबर खायला एकदम परफेक्ट आहेत
पातळ चिरलेला कांदा, बेसन, आणि थोडेसे मसाले हे मिश्रण गरम तेलात सोडून तळले की तयार होतात कुरकुरीत कांदाभजी. गरमागरम चहासोबत याची मजा काही औरच!
मसालेदार भरलेला बटाट्याचे मिश्रण बेसनात बुडवून तळलेला बटाटेवडा हा प्रत्येकाच्या आवडीचा पदार्थ आहे. हा चहा बरोबरचा खमंग सोबती आहे. त्याचा सोबत हिरवी चटणी किंवा गोडसर चिंचगुळाची चटणी मिळाली, तर चव दुप्पट होते.
उपासापुरती मर्यादित न राहता, साबुदाण्याची खिचडी ही एक हलकी पण स्वादिष्ट संध्याकाळची डिश आहे. बटाटे, शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या घालून तयार केलेली ही खिचडी चहासोबत मस्तच लागते.
साहित्य कमी, चव अधिक हेच पोह्यांचं वैशिष्ट्य. कांदा, मोहरी, हळद आणि शेंगदाण्यांनी परतलेले पोहे ही चहा बरोबरची अत्यंत लोकप्रिय डिश आहे.
घरगुती स्टाइलमध्ये बनवलेला पोह्याचा चिवडा त्यात शेंगदाणे, काजू, मसाले, थोडीशी साखर आणि जरा ओलं खोबरं टाकलं की चहा बरोबर खायला फारच छान लागतो.
गव्हाच्या पिठात मेथी, हळद, जिरे वगैरे घालून लाटलेले थेपले संध्याकाळी खायला हलके आणि पौष्टिक असतात. त्यासोबत लोणचं आणि एक कप गरम चहा एकदम जिभेला सुख!
भारतीय चहा म्हंटले की त्यासोबत समोसा आलाच पाहिजे. बटाटा, मटार व मसाल्यांनी भरलेला समोसा हा प्रत्येक वयाच्या लोकांचा आवडता खमंग पदार्थ आहे.