Monika Shinde
उन्हाळ्यात व्यायाम करणं कंटाळवाणं वाटतं का? मग मस्ती, मजेत खेळ खेळून फिट राहा. चला जाणून घेऊया या ५ उत्तम उन्हाळी खेळांबद्दल
तुम्ही थंड ठिकाणी, घरात किंवा स्पोर्ट्स हॉलमध्ये बॅडमिंटन सकाळी किंवा संध्याकाळी खेळू शकता. यामुळे तुमचे चांगलेच व्यायाम होतो आणि तुम्हाला फ्रेश देखील वाटेल.
रोज स्विमिंग केल्याने संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो आणि स्ट्रेस कमी होतो. शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी हा सर्वोत्तम व्यायाम आहे
सकाळच्या ताज्या वातावरणात सायकलिंग करत निसर्गाचा आनंद घ्या. रोज सायकलिंग केल्याने पायांचे स्नायू बळकट होतात आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते.
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये घरात राहून कंटाळा येत असेल, तर शरीर लवचिक आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी योगा आणि डान्स हे सर्वोत्तम पर्याय आहेत
कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी आणि मेंदू ताजातवाना ठेवण्यासाठी तुम्ही कॅरम, सापशिडी / लुडो, पझल्स किंवा मेंदूला चालना देणारे खेळ खेळू शकता.