Anuradha Vipat
लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’नं प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.
अभिनेता मिलिंद गवळी यांनी मालिका संपल्यानंतर एक पोस्ट लिहिली आहे.
या पोस्टमध्ये त्यांनी मालिकेची संकल्पना कशी सुचली, त्याचं शीर्षक कोणी सुचवलं, त्यातील कलाकारांची निवड कोणी केली याविषयी सविस्तरपणे लिहिलं आहे
पोस्टमध्ये मिलिंद गवळी यांनी लिहिलं आहे की, 1491 भाग पूर्ण होऊन आज ही मालिका निरोप घेत आहे.
मिलिंद गवळी यांनी लिहिलं आहे की, अनिरुद्धची भूमिका मी साकारू शकलो की नाही मला माहिती नाही. पण प्रामाणिक प्रयत्न मात्र नक्की केला.
मिलिंद गवळी यांनी लिहिलं आहे की, अजून खूप काही करता आलं असतं, पण आता वेळ निघून गेली. आज ‘आई कुठे काय करते’ या मालिकेचा प्रवास संपला.
मिलिंद गवळी यांनी लिहिलं आहे की, स्थलांतरित पक्ष्यांसारखे सगळे उडून गेले. पुन्हा एकत्र येतील की नाही माहित नाही.