Sandip Kapde
येरवडा मध्यवर्ती कारागृह हा पुणे शहरातील उच्च सुरक्षा असलेला तुरुंग आहे.
हा महाराष्ट्रातील सर्वांत मोठा कारागृह आहे.
तसेच, हा दक्षिण आशियातील प्रमुख आणि विशाल तुरुंगांपैकी एक मानला जातो.
या कारागृहात अनेक कैदी ठेवले जाऊ शकतात.
महात्मा गांधी यांनीही या तुरुंगात बंदिवास भोगला आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात या तुरुंगात अनेक स्वातंत्र्यसैनिकांना कैद करण्यात आले होते.
हे कारागृह तब्बल ५१२ एकर जमिनीवर पसरले आहे.
अत्याधिक सुरक्षा असलेल्या कैद्यांसाठी या तुरुंगात "अंडा सेल" आहे. कैद्यांसाठी विविध सुधारणा आणि उपक्रम येथे राबवले जातात.
गांधीजींच्या विचारांचा प्रचार करण्यासाठी या कारागृहात वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जातात.
अभिनेता संजय दत्त यांनीही ४२ महिने येरवडा कारागृहात काढले होते.
येरवडा खुले कारागृह हे मुख्य कारागृहाच्या बाहेरील आवारात स्थित आहे.
जन्मठेपेची शिक्षा झालेल्या, पाच वर्षे शिक्षा पूर्ण केलेल्या आणि चांगले वर्तन दाखवलेल्या कैद्यांना खुल्या कारागृहात ठेवले जाते.
येथे फक्त मूलभूत सुरक्षा असते आणि कैद्यांना खोल्यांमध्ये बंदिस्त ठेवले जात नाही.Yerwada Jail Inside View
येरवडा कारागृहातील कैदी अनेक वस्तू तयार करतात, ज्या विक्रीसाठी ठेवल्या जातात.
ब्रिटीश राजवटीत या तुरुंगात स्वातंत्र्यसैनिकांना डांबून ठेवले गेले होते.
महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस, जोकिम अल्वा, लोकमान्य टिळक आणि भुरालाल रणछोडदास शेठ यांनी या तुरुंगात काळ व्यतीत केला.